सौंदर्याचा साज

बुध्द लेण्यांमध्ये चढवलेला सौंदर्याचा साज हा वरवर पाहता येणार नाही तो एक महासागर आहे प्रज्ञेचा, ज्ञानाचा, कौशल्याचा, कलात्मकतेचा या महासागरामध्ये स्वच्छंदपणे विहार करण्याची कला मात्र प्रत्येकाला अवगत झाली पाहिजे. लेण्यांमध्ये कोरलेल्या प्रत्येक शिल्प हे दगडामध्ये असले तरी आपल्याला त्यामध्ये कोरलेल्या भावनांशी संवाद साधता आला पाहिजे. तेथे कोरलेल्या बुध्द मूर्तीच्या चेहर्‍यावरील करूणा तो प्रेमाचा भाव अनुभव घेत त्या मूर्तीशी एकरूप झालात तर नकळत बुध्दं सरणं गच्छामि चे सूर ओठांवर येतील.लेण्यांमध्ये कोरलेल्या प्रत्येक शिल्पावरील भरजरी वस्त्रांची सळसळ अनुभवता आली पाहिजे, डोक्यावर असलेला फेटा, शारीरिक सौंदर्यात भर घालणारे दागिने न्याहाळताना तो राजेशाही थाट अनुभवता आला पाहिजे. फक्त छिन्नी आणि हातोडीच्या सहाय्याने ते प्रत्येक शिल्प कोरण्यासाठी वर्षानुवर्षे अनेक पिढ्यांनी दिलेला त्याग, सचोटी आणि धम्माप्रती असलेली एकरूपता ही खरोखरच मानवी मनाच्या समृध्दतेची, विशाल ज्ञानाची, प्रगाढ बुध्दीमत्तेची सर्वोच्च पातळी म्हणावी लागेल. त्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत असेल ते म्हणजे त्या शिल्पकाराच्या मन आणि मेंदूमध्ये वसलेला बुध्द..!

बुध्द लेण्यांमध्ये कोरलेल्या प्रत्येक शिल्पामागिल भावविश्व हे तत्कालिन प्रगत आणि बुध्दाच्या शिकवणी नुसार चालणार्‍या समतेच्या समाजजीवनाचे प्रतीक असून. प्रत्येक शिल्पामागे खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तो अर्थ समजून घेण्यासाठी इतिहास समजून घ्यायला हवा, धम्मलिपीमध्ये कोरलेले शिलालेख या इतिहासाची साक्ष आहेत. याच बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक शिल्पकला साकारल्या जात होत्या. ठिक ठिकाणी ज्ञानदानासाठी विद्यापीठ निर्माण होत होती. समाजजीवन, स्त्रियांच्या जीवनात झालेले आमुलाग्र बदल, आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक धम्माचा मजबूत पाया त्यामुळे बुध्दत्वाकडे जाण्याचा प्रत्येकाला समृध्द मार्ग मिळत होता. परंतु सनातनी कर्मठ लोकांना हेच नको आहे. त्यांना नको आहे कर्मकांड नाकारून समतेवर आधारीत समाजव्यवस्था रुजवू पाहणारा बुध्द. म्हणूनच त्यांनी भिक्खूंच्या कत्तली केल्या, विद्यापीठ नष्ट केली, बुध्द विचारांनी प्रगल्भ ग्रंथसंपदा नष्ट केली, लेण्या विदृप केल्या, शिल्प नष्ट केली, प्राचीन लोकभाषा असणारी पालिभाषा संपवली.परंतु इथल्या जनमानसात खोलवर रुजलेल्या बुध्द त्यांना आव्हान देत उभा होता. तुमच्या प्रतिगामी समाजव्यवस्थेशी सतत दोन हात करण्यासाठी तो सदैव तत्पर असणारा बुध्द ज्ञानाचं प्रतीक आहे. तो सतत इथे प्रज्ञावंतांना मार्ग दाखवत राहील. त्याने दुकाने बंद केली कर्मकांडावर आधारलेली, अज्ञानामुळे मानवता नष्ट करु पाहणारा कर्मठ धर्म आणि त्याच धर्माच्या नावावर आपले दुकान चालविणाऱ्या समाजाने त्याला अवतार रुप देऊन देव्हार्यात बंदिस्त करून संपवण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुमचा देव्हारा सुशोभित करणारा कोणी मोक्षदाता नाही, तो मार्गदर्शन करणारा, योग्य मार्ग दाखविणारा मार्गदाता आहे त्यामुळे तो सदैव प्रेरणा देत राहिल बुध्द लेण्यांच्या रूपात सह्याद्रीच्या काळ्या पाषाणात.–

लक्ष्मण कांबळे
#Team_ABCPR
Dhammsiri
Voice of budhhism youtub chennel

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat