खेड बुद्ध लेणी / khed-buddhist-leni

 लेणीचा प्रकार  : दुर्लक्षित लेणी                                            डोंगररांग : सह्याद्री    लेण्यांची उंची : 
 जिल्हा              : रत्नागिरी                                                  श्रेणी        : सोपी 
तालुका              : खेड            गाव : खेड शहर 

लेणी चा इतिहास :

खेड  हे एक ऐतिहासिक बंदर म्हणून प्रसिद्ध असून ऐतिहासिक प्राचीन व्यापारी मार्ग आहे  खेड  भागात असणारी बौद्ध लेणी हि या ठिकाणाचे महत्व सांगणारे ऐतिहासिक पुरावे आहेत.
खेड बंदराचा इतिहास : खेड हे आजचे नाव असले तरी याचे प्राचीन नावाचा उल्लेख काही शिलालेखात आपणास पाहायला मिळतो तो शिलाहारांचा  शिलालेखात खेड  बंदराचे नाव खेतहर बंदर म्हणून उल्लेख आपणास  पाहायला मिळते तसेच याचा उल्लेख नंतर च्या काळात खेटूक बंदर असे हि झालेले आहे कालान्ताराचे आजचे  खेड  हे  नाव उदयास आलले आहे .
खेड हे जगबुडी नदीच्या खोर्यात बसलेले एक शहर आहे पूर्वीचे  प्राचीन बंदर हे आजुबाजुनी टेकड्यांनी घेरलेले शहर आहे.
प्राचीन काळी गलबते लहान बोटी ह्या दाभोळ च्या खाडीतून खेड पर्यत  येत असत शिवाय या ठिकाणी बाजारपेठ हि अस्थित्वात होती अगदी शिवकालापर्यंत या ठिकाणी बाजारपेठ असे .
या शहराच्या पूर्वेला प्राचीन बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत आज या लेण्यांचे अवशेष आपणास पाहायला मिळतात . खेड शहराची हि ऐतिहासिक महत्व  सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे. खेड लेणी ची निर्मिती कालखंड पहिला तर लेणी हि हीनयान पंथाची असून त्याचा कालखंड हा इसवी सन तिसऱ्या शकताच्या आतमध्ये येतो . लेण्यात कोणताही शिलालेख नसल्याने हि लेणी नेमकी कोणी बांधली याचा नेमका पुरावा सापडत नसला तरी कोकण म्हणजे अपरांत हे गौतमीपुत्र सातकर्णी याच्या अधिपत्याखाली होता हे नाशिक येथील बालश्री चा शिलालेखात आपणास वाचायला मिळतो .
आता हे व्यापारी बंदर असल्याने इथे मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग येत होता बहुतांश लेण्यांना व्यापारी वर्गाने लेणी  कोरण्यास सहकार्य केलेलं आहेत त्याचाच आधार घेत सातवाहन राजांच्या काळात हि लेणी व्यापारी वर्गाने कोरण्यास सहकार्य केले असावे असे अभ्यासानुसार आपण म्हणू शकतो

पाहण्याच्या गोष्टी :

लेणी हि निवासी लेणी असून इथे एक चैत्यगृह आहे शिवाय चैत्यागृहात भिक्षु  निवास हि कोरलेली आहेत. बाजूला अजून दोन लेणी आहेत त्यात हि एक सभागृह आणि भिक्षु निवास आहेत अश्या पद्धतीने हि निवासी लेणी खेड बंदरात असून या लेण्यातील पहिले जे चैत्य विहार असून आत चैत्यगृह आहे हे हीनयान काळातील असल्यामुळे इथे बुद्धाचा स्तूप कोरलेला आहे स्तूप हा रेखीव असून खूप सुंदर पद्धतीने एकाच दगडात कोरलेला आहे . स्तुपाची रचना हि जोते , मेधी वेदिका अंड आणि हार्मिका शिवाय हार्मिका छताला जोडलेली आहेत एकूण च हा स्तूप उद्देशिक स्तूप म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते .
स्तूप म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेवू या
स्तूप बांधण्याची  कला हि   बुद्ध पूर्वी हि असल्याचे आज आपणास पुरावे सापडतात परंतु स्तूप बांधण्याची सुरुवात हि बुद्ध काळात  सुरु झाली होती बुद्धाच्या महापरिनिर्वाण दीना नंतर  त्यांच्या शरीर धातूवर स्तूपांची रचना करण्यात आली आज त्यामधील स्तूपांचे अवशेष पाहायला मिळतात  कपिलवस्तू मधील ;पिपरहवा स्तूप असेल अन्यथा महाराष्ट्रातील पवनी चा स्तूप आहे हे बुद्धाच्या शरीर धातूवर तयार केलेले स्तूप आहेत
त्यानंतर सम्राट अशोकाने बुद्ध धम्मास राजाश्रय दिल्यावर बुद्धाच्या प्रत्येक अवशेषांवर अशोकाने स्तूप बांधण्यास सुरुवात केली बुद्ध ज्या ठिकाणी गेले आहेत त्या ठिकाणी राहिले आहेत त्या ठिकाणी सम्राट अशोकाने स्तूप बांधण्यास सुरुवात केली आणि असंख्य स्तूपांची निर्मिती महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतवर्षात  झाली . जवळपास ८४ ००० स्तूप अशोकाने बांधले होते नंतर जवळपास नऊशे वर्षांनी चिनी प्रवाशी हुएनत्संग  भारतात आला असता त्याने असंख्य स्तूप हे चांगल्या अवस्थेत पहिले असल्याचे त्याने आपल्या प्रवसवर्णनात म्हटले आहे
मौर्यकाळात लोकांनी स्मारक पूजा करण्यास जास्त प्राधान्य दिले  होते आणि त्यानुसार लोक स्तूप हा प्रार्थनास्थळ म्हणून प्रसिद्ध झाला आज सांची भरतहून  असेल  याचे अवशेष त्यावेळच्या स्तूपांच्या रचनेचे प्रकार आपणास सांगतात . अश्या पद्धतीने स्तूपांची रचना असायची महाराष्ट्रामध्ये  सह्याद्रीच्या पाषाणात जेव्हा लेणी  कोरण्यास सुरुवात झाली तेव्हा लेणीत वास्तव्य करणाऱ्या भिक्षु व लेणीवर येणाऱ्या उपासकांना प्रार्थनास्थळ म्हणून लेण्यात स्तूपांची निर्मिती झाली  असंख्य स्तूप आज बुद्ध लेण्यात आपणास पाहायला मिळतात ते सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या  स्तूपांच्या निर्मिती चे एक  उदाहरण आहे . सातवाहन काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कातळात लेणी कोरण्यात आली त्याच काळात खेड व चिपळूण परिसरात हि आपणास लेणी पाहायला मिळतात शिवाय खेड लेणी हि जगबुडी नदीच्या खोर्यात तर चिपळूण येथील लेणी वाशिष्टी नदीच्या खोऱ्यात निर्माण झालेली गिरिशिल्प आहेत जी कोकणातील हा ऐतिहासिक इतिहास जगासमोर घेवून येतात
आज खेड तालुक्याच्या ठिकाणीही असणरी बौद्ध लेणी इतिहासाला समोर घेवून येतात खेड बंदर हे प्राचीन बंदर असुन इथे बौद्ध जनता राहत असल्याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे कारण जिथे लेणी सापडतात तिथे लोकवस्ती हि बौद्ध असते प्राचीन काळात बौद्ध जनतेने धम्माप्रती असलेली आस्था व धम्म प्रचाराचे कर्तव्य आणि दान पारमिता चे उत्तम उदाहरण आपणास या बौद्ध लेण्यात पाहायला मिळते आज हि लेणी आपला इतिहास च नव्हे तर आपली खरी ओळख सागतात  अश्या या बौद्ध लेणीचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे
खेड लेण्यातील शिल्पकला नाही पण स्थापत्य शास्त्र मात्र अजोड आहे एकाच दगडात कोरलेली हि लेणी आजच्या दृष्टीने अनमोल आहेत हि लेणी  खेड चे जुने नाव हे खेतहर असून कालांतराने खेटूक झाले व आज आपणास खेड पाहायला मिळते
  खेड लेणीच्या पासून काही अंतरावर अजून एक बेट आहे त्याला दिवा बेट म्हणतात या ठिकाणी हि बौद्ध इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत चिपळूण मध्ये बावशेवाडी येथील बौद्ध लेणी तर कोळकेवाडी येथील बौद्ध लेणी असे अनेक लेणी समूहात या विभगात आहेत यावरून हा प्रदेश बौद्धमय असल्याची ह्या ऐतिहासिकपाऊलखुणा आहेत त्या जोपासल्या पाहिजे
खेड लेणी  हि आजच्या दृष्टीने  सातवाहन कालीन बौद्ध विरासत  म्हणून जगाच्या इतिहासात नोंद करून बसलेले प्राचीन ऐतिहासिक बंदर आहे याची माहिती बौद्ध बांधवाना असणे आवश्यक आहे लेणी हि आपला वारसा आहेत लेणी हि आपली ओळख आहे त्याच्या संवर्धन आणि जतन करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे

लेणी वर पोहोचण्याच्या वाटा : 

खेड बस स्थानकाच्या वरच्या भागात खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे  डॉ बाबासाहेब  आंबेडकर भवन आहे आंबेडकर भवन च्या अगदी बाजूला च वर हि लेणी आहेत

लेणी वर पाण्याची व्यवस्था नाही पण लेणी च्या आजूबाजूस घरांची वस्ती आहे तिथे पाणी मिळू शकते

लेणीत राहण्याची सोय आहे हि लेणी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या ताब्यात असून त्यांच्या माध्यमातून लेणी ची साफसफाई ठेवली जाते

लेणी च्या वर्क शॉप साठी ABCPR टीम कडे संपर्क साधा

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat